Teachers Day Marathi Quotes
- जे आपल्याला एक व्यक्ती म्हणून घडवतात आणि चांगल्या-वाईटाची ओळख करून देतात, देशातील या निर्मात्यांना आम्ही करतो शत शत प्रणाम. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश…
- जे आपल्याला शिकवतात, आपल्याला समजवतात. आपल्या मुलांचं भविष्य घडवतात. माझे मित्र, गुरू आणि प्रकाश बनण्यासाठी धन्यवाद.
- तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे आशिर्वादापेक्षा कमी नाही. माझं जग बदलण्यासाठी खूप खूप धन्यवाद. शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
- आम्हाला घडवण्यासाठी जी कठोर मेहनत आणि प्रयत्न तुम्ही केले त्याबद्दल आम्ही तुमचे सदैव ऋृणी राहू. हॅपी टीचर्स डे.
- माता गुरू आहे, पिताही गुरू आहे. विद्यालयातील शिक्षक गुरू आहेत. ज्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळालं त्या सर्व व्यक्ती गुरू आहेत. या शिक्षक दिनाच्या दिवशी सर्व गुरूजनांना कोटी कोटी प्रणाम.
- आईबाबांच्या रूपात गुरू आहे. या कलियुगात देवाच्या रूपात गुरू आहे. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (shikshak dinachya hardik shubhechha).
- तुम्ही शिकवलं वाचायला, तुम्हीच शिकवलं लिहायला, गणितही शिकलो तुमच्याकडून आणि भूगोलही शिकलो तुमच्याकडून वारंवार नमन करतो तुम्हाला. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा स्वीकारा.
- जन्मदात्यांपेक्षा जास्त महत्त्व आहे शिक्षकांना कारण ज्ञान व्यक्तीला माणूस बनवतं. जे योग्य जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा.
- माझ्या जीवनाची प्रेरणा आहे, तुम्हीच माझे मार्गदर्शक आहात. तुम्हीच माझ्या जीवनाचा प्रकाशस्तंभ आहात. हॅपी टीचर्स डे.
- मी भाग्यशाली आहे की, तुमच्यासारखा गुरू मिळाला. शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
- जगातील सर्वात बेस्ट टीचर घोषित करण्यात आलं आहे आणि हे पुरस्कार जातो तुम्हाला. शिक्षकदिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
- जर गोष्ट शिकवण्याची असेल तर तुमच्यापेक्षा चांगलं कोणी असूच शकत नाही. हॅपी टीचर्स डे.
- आज तुमच्यामुळे माझं भविष्य सोनेरी आहे मला प्रेरित करण्यासाठी धन्यवाद.
- प्रिय टीचर आज मी जे काही आहे ते घडवण्यासाठी आभार. हॅपी टीचर्स डे.
- तुम्ही फक्त एक टीचर नाही, माझ्या एक खरी प्रेरणा आहात. तुम्ही मला फक्त आपलंस केलं नाहीतर आम्हाला घडवलं आहे.